
मुंबई, 23 जुलै (हिं.स.)। वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड (WRTL) ही वारी समूहाची EPC शाखा असून, EPC आणि ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन (T&D) क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. अक्षय ऊर्जा EPC हा कंपनीचा मुख्य व्यवसाय असला तरी, WRTL ने त्यास पूरक अशा विविध क्षेत्रांमध्येही आपल्या क्षमतांचा विस्तार केला आहे. अलीकडेच असोसिएटेड पॉवर स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड (APSPL) चे अधिग्रहण केल्यामुळे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन (T&D) क्षेत्रातील कंपनीचे स्थान अधिक बळकट झाले आहे. याशिवाय, कंपनी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम्स आणि डेटा सेंटर क्षेत्रातील EPC संधींचाही सक्रियपणे पाठपुरावा करत आहे. या सर्व उपक्रमांमधून स्वच्छ ऊर्जा मूल्यसाखळीत अधिक व्यापक आणि एकात्मिक स्थान निर्माण करण्याचा WRTL चा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. कंपनीने 30 जून, 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीसाठीचे लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.
महत्त्वाचे आर्थिक ठळक मुद्दे
आर्थिक वर्ष 27 ची पहिली तिमाही कामकाजामधून मिळालेले उत्पन्न 924.25 कोटी रु. इतके नोंदविण्यात आले असून आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीतील 603.19 कोटी रु.च्या तुलनेत वार्षिक आधारावर (YoY) 53.23% वाढ झाली आहे. व्यवसायाच्या बळकटीचे खरे मोजमाप हे सातत्यपूर्ण वार्षिक (YoY) वाढीतूनच होते यावर आमचा विश्वास आहे.
EBITDA 173.48 कोटी रु. इतका राहिला असून आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीतील 117.55 कोटी रु.च्या तुलनेत वार्षिक आधारावर (YoY) 47.58% वाढ नोंदविण्यात आली.
करपश्चात नफा (PAT) 118.97 कोटी रु. इतका झाला असून आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीतील 86.40 कोटी रु.च्या तुलनेत वार्षिक आधारावर (YoY) 37.70% वाढ झाली.
ऑर्डर बुक स्थिती
एकत्रित अंमलबजावणी न झालेली ऑर्डर बुक 5,300 कोटी रु. हून अधिक
सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी 37 GWp हून अधिक, BESS साठी 10 GWh हून अधिक आणि ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन (T&D) क्षेत्रासाठी 20 हजार कोटी रु. हून अधिक इतकी मजबूत बोली प्रक्रिया कायम आहे.
महत्त्वाच्या अद्ययावत घडामोडी
अलीकडील प्राप्त ऑर्डर: 1,520 MWh क्षमतेची BESS ऑर्डर
450 MWp क्षमतेच्या ग्राउंड-माउंटेड सौर ऊर्जा प्रकल्पासाठीची ऑर्डर
असोसिएटेड पॉवर स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड (T&D) मधील 55% इक्विटी हिस्साचे अधिग्रहण.
निकालांबाबत भाष्य करताना वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) श्री. मनमोहन शर्मा म्हणाले: “भूराजकीय तणाव, शुल्कांबाबतची अनिश्चितता, पुरवठा साखळीतील बदल तसेच प्रादेशिक संघर्ष यांसारख्या विविध आव्हानांचा जागतिक व्यावसायिक वातावरणावर अजूनही परिणाम होत आहे. या आव्हानात्मक परिस्थितीतही आर्थिक वर्ष 27 ची सुरुवात आम्ही दमदार कामगिरीने केल्याचा आम्हाला आनंद आहे. आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्न 924.25 कोटी रु. इतके नोंदविण्यात आले. आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीतील 603.19 कोटी रु.च्या तुलनेत 53.23% इतकी भक्कम वार्षिक (YoY) वाढ झाली आहे. आमच्या EPC पोर्टफोलिओमधील सातत्यपूर्ण प्रकल्प अंमलबजावणी, स्त्रोतांचा कार्यक्षम वापर आणि शिस्तबद्ध प्रकल्प पूर्ततेवर कायम असलेला भर यामुळे ही कामगिरी साध्य झाली आहे.
जून 2026 अखेर भारताची एकूण जोडणी झालेली अक्षय ऊर्जा क्षमता 288 GW पेक्षा अधिक झाली असून त्यामध्ये सौर ऊर्जा क्षमता 162 GW चा टप्पा ओलांडत देशाच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला सर्वाधिक चालना देणारा घटक ठरली आहे. 2030 पर्यंत जीवाश्म इंधनाव्यतिरिक्त 500 GW ऊर्जा क्षमता उभारण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उपयुक्तता-आधारित अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी अद्यापही मोठी संधी उपलब्ध आहे. याशिवाय, ग्रिडची स्थिरता आणि चोवीस तास स्वच्छ वीजपुरवठ्याच्या वाढत्या मागणीमुळे BESS EPC आणि हायब्रिड अक्षय ऊर्जा प्रकल्प हेही भविष्यातील महत्त्वाचे वाढीचे क्षेत्र म्हणून उदयास येत आहेत.
या तिमाहीत आम्ही असोसिएटेड पॉवर स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडमधील 55% हिस्सा अधिग्रहित केला. या अधिग्रहणामुळे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन (T&D) क्षेत्रातील आमच्या क्षमतांना अधिक बळ मिळाले असून एकात्मिक उपाययोजना सादर करण्याची आमची क्षमता वाढली आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्या अक्षय ऊर्जा EPC व्यवसायाचा विस्तारही शिस्तबद्ध आणि विस्तारक्षम पद्धतीने सुरू ठेवत आहोत.
सक्षम आणि अंमलबजावणी न झालेल्या 5,300 कोटी रु.हून अधिकच्या ऑर्डर बुकच्या पाठबळावर आणि विस्तारत असलेल्या ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स (O&M) क्षमतांच्या पाठबळामुळे WRTL सातत्यपूर्ण वाढीसाठी सक्षम स्थितीत आहे. मजबूत प्रकल्प अंमलबजावणीचा अनुभव आणि सातत्याने विस्तारत असलेल्या क्षमतांच्या आधारे आमच्या दीर्घकालीन वाढीच्या धोरणाबाबत आम्ही ठामपणे आशावादी आहोत. शिस्तबद्ध अंमलबजावणी, कार्यक्षमतेतील उत्कृष्टता आणि आमच्या सर्व भागधारकांसाठी शाश्वत मूल्यनिर्मिती यावर आम्ही पुढेही सातत्याने भर देत राहू.”
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर