अलीरेझा फिरौजाला चेन्नई ग्रँडमास्टर्सचे विजेतेपद, अर्जुन एरिगैसीसोबत सामना बरोबरीत
चेन्नई, 23 जुलै (हिं.स.)फ्रेंच ग्रँडमास्टर अलीरेझा फिरौजाने भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसीविरुद्ध सातवी आणि अंतिम फेरी बरोबरीत सोडवून चेन्नई ग्रँडमास्टर्स २०२६ चे विजेतेपद पटकावले.स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी, फिरौजा ४ गुणांसह आघाडीवर होता आणि अ
अलीरेझा फिरौजाला चेन्नई ग्रँडमास्टर्स विजेतेपद


चेन्नई, 23 जुलै (हिं.स.)फ्रेंच ग्रँडमास्टर अलीरेझा फिरौजाने भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसीविरुद्ध सातवी आणि अंतिम फेरी बरोबरीत सोडवून चेन्नई ग्रँडमास्टर्स २०२६ चे विजेतेपद पटकावले.स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी, फिरौजा ४ गुणांसह आघाडीवर होता आणि अर्जुन एरिगैसी व उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव यांच्यापेक्षा अर्ध्या गुणाने पुढे होता. विजेतेपद जिंकण्यासाठी त्याला फक्त सामना बरोबरीत सोडवण्याची गरज होती. त्याने अर्जुनविरुद्धचा सामना ४१ चालींनंतर बरोबरीत सोडवला आणि ४.५ गुणांसह विजेतेपद निश्चित केले.

दुसरीकडे, काळ्या मोहऱ्यांसह विजय मिळवून स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोवचा रशियाच्या दिमित्री आंद्रेकिनकडून ३७ चालींमध्ये पराभव झाला. या पराभवानंतर, फिरौजाला विजेतेपद मिळवण्यासाठी सामना बरोबरीत सोडवणे पुरेसे होते. संपूर्ण स्पर्धेत फिरौजाने दोन सामने जिंकले आणि उर्वरित पाच सामने अनिर्णित राखले. या कामगिरीमुळे त्याला ४.५ गुण मिळाले, तो विजेता ठरला आणि त्याने २५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम पटकावली.

दिमित्री आंद्रेकिनने अंतिम फेरीत विजय मिळवून चार गुण मिळवले आणि भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसीसोबत संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले. नोदिरबेक अब्दुसत्तोरोव, निहाल सरिन आणि एम. प्रनेश प्रत्येकी ३.५ गुणांसह संयुक्तपणे चौथे स्थान पटकावले.विश्वविजेता डी. गुकेशसाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरली. त्याने आपल्या सातपैकी तीन सामने गमावले आणि केवळ दोन गुणांसह तो क्रमवारीत शेवटच्या स्थानावर राहिला. अंतिम फेरीत त्याचा सामना अमेरिकेच्या हान्स निमनविरुद्ध अनिर्णित राहिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande