पंतप्रधान मोदींकडून पॉवरलिफ्टर झंडू कुमारचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन
नवी दिल्ली, २५ जुलै (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्याबद्दल भारतीय पॅरा-पॉवरलिफ्टर झंडू कुमारचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले, झं
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, २५ जुलै (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्याबद्दल भारतीय पॅरा-पॉवरलिफ्टर झंडू कुमारचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदींनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले, झंडू कुमारची शानदार कामगिरी! त्याने पुरुषांच्या हेवीवेट पॅरा-पॉवरलिफ्टिंग प्रकारात कांस्य पदक जिंकून २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकतालिकेचे उद्घाटन केले आहे. त्याचे अभिनंदन! त्याची ही कामगिरी त्याची प्रचंड ताकद, अढळ निर्धार आणि अनेक वर्षांच्या शिस्तबद्ध मेहनतीचे एक उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून, त्याने संपूर्ण राष्ट्राला गौरव मिळवून दिला आहे आणि असंख्य भारतीयांना प्रेरणा दिली आहे.

भारतीय पॅरा-पॉवरलिफ्टर झंडू कुमारने शुक्रवारी रात्री उशिरा पुरुषांच्या हेवीवेट पॅरा-पॉवरलिफ्टिंग प्रकारात कांस्य पदक जिंकून देशाला या स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande