सोनम रघुवंशीला मोठा धक्का: सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द
- तीन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे आदेश नवी दिल्ली, 23 जुलै (हिं.स.)इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीची पत्नी सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने तिचा जामीन रद्द केला असून तिला ३ आठवड्यांत आत्मसमर्पण कर
सुप्रीम कोर्टा


- तीन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली, 23 जुलै (हिं.स.)इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीची पत्नी सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने तिचा जामीन रद्द केला असून तिला ३ आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. मेघालय सरकारच्या अपिलावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला. इंदूरचे वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हनिमूनदरम्यान झालेल्या हत्येतील आरोपीची पत्नी सोनम रघुवंशीला दिलेल्या जामिनाला आव्हान देणारी याचिका मेघालय सरकारने दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने खटल्याची सुनावणी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जर सहा महिन्यांत सुनावणी पूर्ण झाली नाही, तर सोनम नवीन जामिनासाठी अर्ज दाखल करू शकते. न्यायालयाने तिला तीन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे आदेशही दिले आहेत.

३० जून रोजी, मेघालय उच्च न्यायालयाने राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन कायम ठेवला आणि मेघालय सरकारचे आव्हान फेटाळून लावले. उच्च न्यायालयाने अटक प्रक्रियेतील त्रुटी मान्य केल्या. मेघालय सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

मंगळवारी, सर्वोच्च न्यायालयाने सोनमच्या वकिलासमोर दोन पर्याय ठेवले: एकतर सोनम रघुवंशीने आत्मसमर्पण करावे किंवा न्यायालय तिचा जामीन रद्द करण्याचा निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या आपल्या उत्तरात, आरोपी सोनम रघुवंशीने स्वतःला निर्दोष घोषित केले आणि सांगितले की तिला या प्रकरणात खोट्या आरोपांखाली गोवण्यात आले आहे. तिच्याविरुद्धचा फिर्यादी पक्षाचा संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. त्यामुळे, केवळ आरोपांच्या आधारे तिला दोषी ठरवता येणार नाही.

दरम्यान, मेघालय सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, त्या दस्तऐवजात केवळ एका कायदेशीर कलमाच्या क्रमांकाची टंकलेखन चूक झाली होती. अशा किरकोळ तांत्रिक चुकीच्या आधारावर जामीन मंजूर केला जाऊ नये. मेहता यांनी असाही युक्तिवाद केला की, जर सोनमचा जामीन कायम ठेवला गेला, तर ती फरार होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande