सुरगाण्याला तीन- दिंडोरीला दोन सौम्य भूकंपाचे धक्के
बोरगाव घाटमाथा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बोरगाव, 25 जुलै (हिं.स.)। - जिल्ह्यातील सुरगाणा व दिंडोरी या दोन तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जानविले असून नाशिक पासून सर्वसाधारण 45 ते 47 किलोमीटर अंतरावरती भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रश
सुरगाण्याला तीन- दिंडोरीला दोन सौम्य भूकंपाचे धक्के


बोरगाव घाटमाथा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बोरगाव, 25 जुलै (हिं.स.)।

- जिल्ह्यातील सुरगाणा व दिंडोरी या दोन तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जानविले असून नाशिक पासून सर्वसाधारण 45 ते 47 किलोमीटर अंतरावरती भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाटमाथा परिसरात शनिवारी सकाळी भूकंपाचे सलग तीन सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पहिला धक्का सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास जाणवला. त्यानंतर काही वेळाच्या अंतराने आणखी दोन सौम्य धक्के बसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती तातडीने मेरी येथील भूकंपमापन केंद्रामध्ये कळविण्यात आली या ठिकाणी सुट्टीचा दिवस असल्यामुळे मापन केंद्रावरील माहिती मिळविण्यात थोडा उशीर झाला मिळालेल्या माहितीनुसार सकाळी नऊ वाजून 55 मिनिटांनी नाशिक पासून 45 किलोमीटरच्या अंतरावर ती तीन स्केलचा धक्का बसलेला आहे त्यानंतर दहा वाजून एक मिनिटांनी नाशिक पासून 47 किलोमीटर अंतरावरील केंद्रबिंदू असून 2.2 रिक्त स्केल एवढी नोंद झालेली आहे दहा वाजून दोन मिनिटांनी नाशिक पासून 46 किलोमीटर अंतरावरती केंद्रबिंदू असून दोन रेक्टर स्केल एवढी नोंद झाली आहे तर 11:10 ने बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याचे केंद्रबिंदू नाशिक पासून 45 किलोमीटर अंतरावर ती असून 2.5 रेक्टर स्केल एवढी नोंद झालेली आहे

भूकंपाचे धक्के जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र अचानक झालेल्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती.

भूकंपाची तीव्रता आणि केंद्रबिंदू याबाबत अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नसून संबंधित यंत्रणेकडून माहितीची प्रतीक्षा आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार रामजी राठोड व पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या कडून करण्यात येत आहे.

दरम्यान दिंडोरी येथील वार्ताहरने दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील ही भूकंपाचे धक्के आहे जानवी असून तालुक्यातील भनवड या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणविल्याची नोंद झाली आहे तातडीने ग्रामस्थांनी याबाबतची माहिती तहसील कार्यालयाला दिली त्यानंतर तहसीलदारांनी या ठिकाणी भेट दिली असून त्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे या ठिकाणी दोन भूकंपाची धक्के बसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

जिल्ह्यातील दोन तालुक्यांना भूकंपाचे धक्के बसल्यानंतर वेगवेगळ्या अफवा सुरू झालेल्या होत्या या वरती जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर ती विश्वास ठेवू नये प्रशासनाने नियंत्रण कक्ष हे सुरू केले आहे त्यामार्फत नियंत्रण हे ठेवले जात आहे याबाबतचा नंबर हा प्रकाशित करण्यात आलेला आहे नागरिकांनी काही अडचण असेल तर या ठिकाणी संपर्क साधावा

आयुष प्रसाद जिल्हाधिकारी

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande