
नवी दिल्ली, 25 जुलै (हिं.स.)। नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की काही बनावट संकेतस्थळे आणि पोर्टल्स ‘एअर सुविधा 2.0’ची नक्कल करून प्रवाशांची दिशाभूल करत आहेत. तसेच, त्यांना पैसे भरण्याच्या बनावट पृष्ठावर पाठवून आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे.
प्रवाशांना सूचित करण्यात येते की 'एयर सुविधा 2.0' च्या सेवा पूर्णपणे मोफत पुरविल्या जातात आणि स्व-घोषणापत्र सादर करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 'एयर सुविधा 2.0' चे एकमेव अधिकृत पोर्टल पुढीलप्रमाणे आहे:
https://airsuvidha.civilaviation.gov.in/ प्रवाशांना विनंती करण्यात येते की कोणतीही वैयक्तिक किंवा प्रवासाशी संबंधित माहिती देण्यापूर्वी संकेतस्थळाचे यूआरएल काळजीपूर्वक तपासावे आणि 'एयर सुविधा 2.0' सेवा देण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही अनाधिकृत संकेतस्थळावर पैसे भरणे टाळावे. प्रवाशांनी केवळ अधिकृत पोर्टलचाच वापर करावा आणि अधिकृत माहितीसाठी सरकारच्या अधिकृत निवेदनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे. प्रवाशांची जनजागृती आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या हितार्थ जारी.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule