टीईटी पेपरफुटी प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ताला बिहारहून अटक
मुंबई, 25 जुलै (हिं.स.) : राज्यात गाजलेल्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून त्याचा शोध सुरू होत
टीईटी पेपरफुटीचा मुख्य आरोपी विरेंद्र गुप्ता


मुंबई, 25 जुलै (हिं.स.) : राज्यात गाजलेल्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाने बिहारमध्ये मोहीम राबवत ही कारवाई केली.

अटकेनंतर वीरेंद्र कुमार गुप्ता याला हवाई मार्गाने पुणे विमानतळावर आणण्यात आले असून, तेथून कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्याला भिवंडी येथे नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात वीरेंद्र कुमार गुप्ता याची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्याच्या चौकशीतून संपूर्ण पेपरफुटी रॅकेट, त्यामध्ये सहभागी असलेले इतर आरोपी, आर्थिक व्यवहार तसेच कटाशी संबंधित अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.भिवंडी पोलिसांच्या या कारवाईमुळे टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा असून, या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर संशयितांविरोधातही लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande