आसाममधील पुरामुळे नऊ जिल्ह्यांतील ५.२४ लाख लोकसंख्या प्रभावित
- आतापर्यंतच्या मृतांची संख्या ६८ वर गुवाहाटी, 27 जुलै (हिं.स.)। आसाममध्ये पुराचे पाणी आता वेगाने ओसरू लागले आहे, मात्र पूरग्रस्त भागांचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. शेतांतील उभी पिके नष्ट झाली आहेत, तर घरे, रस्ते आणि शाळांमध्ये पाण्यासोबत आलेल्या
Assam flood relief 68 deaths


आसाम महापूर


आसाम महापूर


- आतापर्यंतच्या मृतांची संख्या ६८ वर

गुवाहाटी, 27 जुलै (हिं.स.)। आसाममध्ये पुराचे पाणी आता वेगाने ओसरू लागले आहे, मात्र पूरग्रस्त भागांचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. शेतांतील उभी पिके नष्ट झाली आहेत, तर घरे, रस्ते आणि शाळांमध्ये पाण्यासोबत आलेल्या गाळामुळे नवे आव्हान निर्माण झाले आहे. प्रभावित नागरिकांच्या डोळ्यांत एक प्रकारची पोकळी दिसून येत आहे. सरकारकडून शक्य ते सर्व प्रयत्न सुरू असल्याचा सातत्याने दावा केला जात असला, तरी परिस्थितीने नवे आव्हान उभे केले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) यांनी २६ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आणखी दोघांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतच्या मृतांची एकूण संख्या ६८ वर पोहोचली आहे. आसाममध्ये धनसिरी (नुमालीगड) नदी धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहे.

मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्व सरमा यांनी रविवारी रात्री सोशल मीडियाद्वारे सांगितले की, विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्यातील सर्व मंत्री पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतील.पुरामुळे सध्या एकूण नऊ जिल्हे अजूनही गंभीररीत्या प्रभावित आहेत. यात चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, शिवसागर, होजाई, कामरूप, नगाव, कामरूप (मेट्रो) आणि डिब्रुगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुरामुळे नऊ जिल्ह्यांतील २४ महसूल मंडळांतील एकूण ७६३ गावे प्रभावित झाली आहेत. राज्यातील एकूण ५ लाख २४ हजार ७३३ लोकसंख्या आणि ४८ हजार ७४२.०९ हेक्टर कृषी जमीन पाण्याखाली आहे.

राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी एकूण १०९ मदत शिबिरे आणि २४५ मदत वितरण केंद्रांसह एकूण ३४५ केंद्रे उभारली आहेत. मदत शिबिरांमध्ये ३७ हजार ७२४ लोकांनी आश्रय घेतला आहे. तर मदत वितरण केंद्रांवर १ लाख ५३ हजार ८३३ शिबिराबाहेरील नागरिकांना मदत पुरवली जात आहे. २६ जुलै रोजीही पुराच्या पाण्यातून चराईदेव जिल्ह्यात दोन मृतदेह सापडले. पुरामुळे प्रभावित जनावरांची एकूण संख्या ८८२४० इतकी नोंदवली गेली आहे. त्यात मोठी जनावरे ४५८९५, लहान जनावरे २६३३५ आणि कुक्कुटपालनातील १६०१० पक्ष्यांचा समावेश आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात एकूण २६५१२ जनावरे वाहून गेली. चराईदेव जिल्ह्यात ९९७३ आणि शिवसागर जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३९५ पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची नोंद आहे.

२६ जुलैपर्यंत पुरामुळे पूर्णपणे नुकसान झालेल्या कच्च्या घरांची एकूण संख्या ५७९ असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात जोरहाटमध्ये १९ आणि शिवसागरमध्ये ५६० घरे आहेत. अंशतः नुकसान झालेल्या कच्च्या घरांची एकूण संख्या १५६० असून त्यात जोरहाट जिल्ह्यात ६० आणि शिवसागर जिल्ह्यात १५०० घरे आहेत. अंशतः नुकसान झालेल्या पक्क्या घरांची एकूण संख्या ५१ आहे. त्यात जोरहाट जिल्ह्यात ०६ आणि शिवसागर जिल्ह्यात ४५ घरे आहेत. इतर नुकसान झालेल्या बांधकामांमध्ये शिवसागर जिल्ह्यात २५० झोपड्यांचा समावेश आहे. तसेच जनावरांच्या गोठ्यांची नुकसानग्रस्त एकूण संख्या ७९२ असून त्यात शिवसागर जिल्ह्यात २५० आणि जोरहाट जिल्ह्यात १२ गोठे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मदत आणि बचाव कार्यात एसडीआरएफ, सेना/अर्धसैनिक दल, एनडीआरएफ, डीडीआरएफ, एअर फोर्स, पोलीस, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (एफ अँड ईएस), सर्कल कार्यालय/स्थानिक प्रशासन, नागरी संरक्षण/प्रशिक्षित स्वयंसेवक आणि अग्निशमन विभाग कार्यरत आहेत. दरम्यान, पूरग्रस्त भागांत राज्य सरकारने एकूण १५२ वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. या काळात ३६ बोटीही मदतकार्यात गुंतल्या होत्या. तसेच मदतकार्य अधिक वेगाने करण्यासाठी दोन हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहेत.

राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना तांदूळ (क्विंटलमध्ये): ३३०२.५४८, डाळ (क्विंटलमध्ये): ५९०.९९८, मीठ (क्विंटलमध्ये): १७७.३७६१, मोहरीचे तेल (लिटरमध्ये): १७७३५.९५ तसेच पशुखाद्य – गव्हाचा कोंडा (क्विंटलमध्ये): ४४६.२४ आणि पशुखाद्य – तांदळाचा कोंडा (क्विंटलमध्ये): १४६.२१ इतक्या प्रमाणात मदत सामग्रीचे वितरण करण्यात आले. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी सरकार सातत्याने आढावा बैठका घेऊन परिस्थितीचे परीक्षण करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande