
परभणी, 03 जुलै, (हिं.स.) - येलदरी धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक स्थिती कायम असून आज 3 जूलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत धरणातील जिवंत पाणीसाठा 422.454 दलघमी इतका नोंदविण्यात आला आहे. हा साठा धरणाच्या एकूण जिवंत साठा क्षमतेच्या 52.17 टक्के आहे.
धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता 934.440 दलघमी असून त्यापैकी मृत पाणीसाठा 124.670 दलघमी आणि जिवंत पाणीसाठा क्षमता 809.770 दलघमी आहे. सध्या धरणात एकूण 547.124 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाची पाणीपातळी 457.460 मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. मागील 24 तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून 0.982 दलघमी (13.778 दशलक्ष घनमीटर) इतकी आवक झाली आहे. धरण परिसरात आज 6 मिमी पावसाची नोंद झाली असून चालू वर्षातील एकूण पर्जन्यमान 175 मिमीपर्यंत पोहोचले आहे. धरणाची ईशारा पाणीपातळी 461.772 मीटर तर धोका पाणीपातळी 462.380 मीटर निश्चित करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis