अमरावती सायकलिंग असोसिएशनतर्फे पंढरपूर सायकलवारीचे दुसऱ्यांदा आयोजन
अमरावती, 03 जुलै (हिं.स.)। अमरावती सायकलिंग असोसिएशनची संघटना अमरावती मध्ये नेहमीच सायकलिंगचे महत्त्व वाढविण्यासाठी व नागरिकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण व्हावी या हेतूने विविध उपक्रम राबवित असते. याच अनुषंगाने ही संघटना वर्षभर विविध सायकलि
अमरावती सायकलिंग असोसिएशनतर्फे पंढरपूर सायकलवारीचे दुसऱ्यांदा आयोजन


अमरावती, 03 जुलै (हिं.स.)।

अमरावती सायकलिंग असोसिएशनची संघटना अमरावती मध्ये नेहमीच सायकलिंगचे महत्त्व वाढविण्यासाठी व नागरिकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण व्हावी या हेतूने विविध उपक्रम राबवित असते. याच अनुषंगाने ही संघटना वर्षभर विविध सायकलिंग चॅलेंजचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर करत असते. या स्पर्धांना नेहमीच देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यावर्षी अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे पंढरपूर सायकल वारी चे दुसर्या वेळेस आयोजन करण्यात येत आहे.

पंढरपूर येथे आयोजित पाचवी अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी व सम्मेलन २०२६ मध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून ४००० ते ५००० सायकल स्वार सहभागी होणार आहेत. अमरावती सायकल असोसिएशनचे ३७ सायकलस्वार व ४ सहकारी सदस्य येथून वारी करिता जात आहेत. या सायकल वारीचा शुभारंभ ०७ जुलै सकाळी ६.०० वाजता एकविरा देवी मंदिरचे प्रांगण येथून होणार आहे. सायकलवारी करिता ५६६ कीमी अंतर पार करायचे असून वारीचा मार्ग मंगळवार दि. ०७ जुलै अमरावतीवरून कारंजा, मंगरुळपीरला पहिल्या दिवसाचा मुक्कामानंतर वाशिम, हिंगोली, ओंढा नागनाथ, जवळा बाजार वरून दुसर्या दिवसाचा मुक्काम त्यानंतर तिसर्या दिवशी परभणी, गंगाखेड, परळी वैज्यनाथ ला मुक्काम. चौथा दिवस दि. १० जुलैला अंबाजोगाइ, कळबं, येरमाळा, बार्शी येथे मुक्काम व पाचवा दिवस कुरूडवाडी, अढीव, व पंढरपूर येथे मुक्काम.रविवार दि. १२ जुलै २०२६ रोजी पंढरपूर येथे आयोजित पाचवी अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी व सम्मेलन २०२६ मध्ये सहभाग नोंदवणार आहे. यावर्षीचे यजमान पद श्रीरामपूर सायकलिंग असोसिएशन यांच्याकडे आहे. पंढरपूर येथे होणारा कार्यकम खालीलप्रमाणे आहे. १२ जुलै, सकाळी ६.०० वाजता सायकलनी नगर प्रदक्षिणा, विठ्ठल रुख्मिणी निवास येथून सुरू होणार, तदनंतर सकाळी ७.०० रेल्वे ग्राऊंड वर सर्व समाविष्ट सायकल वारकर्यांचे अभूतपूर्व सायकल रिंगण सोहळा संपन्न होणार. या वारीत लक्ष्मीकांत खंडागळे सर यांच्या नेतृत्वामध्ये खालील सदस्य सहभागी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande