
मुंबई, 03 जुलै (हिं.स.) - मध्य रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार २१६ विशेष रेल्वे सेवांची मुदत वाढवणार आहे. याचा तपशील खालीलप्रमाणे
दैनंदिन गाड्या (१५० सेवा)
गाडी क्रमांक 01449 पुणे - दानापूर दैनंदिन विशेष गाडी, दिनांक १५.०७.२०२६ पर्यंत चालवण्याचे अधिसूचित केले होते, आता तिची मुदत दिनांक १६.०७.२०२६ ते दिनांक २८.०९.२०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. (७५ सेवा).
गाडी क्रमांक 01450 दानापूर - पुणे दैनंदिन विशेष गाडी, दिनांक १७.०७.२०२६ पर्यंत चालवण्याचे अधिसूचित केले होते, आता तिची मुदत दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक ३०.०९.२०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. (७५ सेवा).
गाडी क्रमांक 01449/01450 साठी डब्यांची संरचना : १ वातानुकुलीत द्वितीय, ५ वातानुकुलीत तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
साप्ताहिक गाड्या (६६ सेवा)
गाडी क्रमांक 04152 लोकमान्य टिळक टर्मिनस - कानपूर साप्ताहिक विशेष गाडी दर शनिवारी दिनांक ११.०७.२०२६ पर्यंत चालवण्याचे अधिसूचित केले होते, आता तिची मुदत दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक २६.०९.२०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे (११ सेवा).
गाडी क्रमांक 04151 कानपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी दर शुक्रवारी दिनांक १०.०७.२०२६ पर्यंत चालवण्याचे अधिसूचित केले होते, आता तिची मुदत दिनांक १७.०७.२०२६ ते दिनांक २५.०९.२०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे (११ सेवा)
गाडी क्रमांक 04152/ 04151 साठी डब्यांची संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ४ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ८ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
गाडी क्रमांक 01921 हडपसर - वीरांगना लक्ष्मीबाई झाशी साप्ताहिक विशेष गाडी दर गुरुवारी दिनांक १६.०७.२०२६ पर्यंत चालवण्याचे अधिसूचित केले होते, आता तिची मुदत दिनांक २३.०७.२०२६ ते दिनांक ०१.१०.२०२६ या कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. (११ सेवा)
गाडी क्रमांक 01922 वीरांगना लक्ष्मीबाई झाशी - हडपसर साप्ताहिक विशेष गाडी दर बुधवारी दिनांक १५.०७.२०२६ पर्यंत चालवण्याचे अधिसूचित केले होते, आता तिची मुदत दिनांक २२.०७.२०२६ ते दिनांक ३०.०९.२०२६ या कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. (११ सेवा)
गाडी क्र. 01923 हडपसर - वीरांगना लक्ष्मीबाई झाशी साप्ताहिक विशेष गाडी दर रविवारी दिनांक १२.०७.२०२६ पर्यंत चालवण्याचे अधिसूचित केले होते, आता तिची मुदत दिनांक १९.०७.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. (११ सेवा)
गाडी क्र. 01924 वीरांगना लक्ष्मीबाई झाशी - हडपसर साप्ताहिक विशेष गाडी दर शनिवारी दिनांक ११.०७.२०२६ पर्यंत चालवण्याचे अधिसूचित केले होते, आता तिची मुदत दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक २६.०९.२०२६ या कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. (११ सेवा)
गाडी क्रमांक 01921/ 01922/ 01923/ 01924 या गाड्यांची संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ३ वातानुकुलीत तृतीय, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी