परभणी - अल्पसंख्यांक मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
परभणी, 03 जुलै (हिं.स.)। शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयासमोर, जिंतूर रोड येथे अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी कार्यरत असलेल्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थिन
परभणी - अल्पसंख्यांक मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन


परभणी, 03 जुलै (हिं.स.)। शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयासमोर, जिंतूर रोड येथे अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी कार्यरत असलेल्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी दि. ६ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत प्रत्यक्ष वसतिगृह कार्यालयात उपस्थित राहून प्रवेश नोंदणी करावी.

वसतिगृहात एकूण ६० विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था उपलब्ध असून त्यानुसार मुस्लिम समाजासाठी १५, बौद्ध ९, ख्रिश्चन ३, जैन ३, शीख १, पारशी १, आयटीआय १५ तसेच खुल्या प्रवर्गासाठी १३ जागा उपलब्ध आहेत.खुल्या व इतर प्रवर्गातील विद्यार्थिनींकडून प्रति सत्र ₹२,८५० इतके निवासी शुल्क आकारण्यात येणार आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना जेवण, नाश्ता व इतर भोजनाचा खर्च स्वतः करावा लागणार आहे. तथापि, शासनाच्या आहार भत्ता योजनेअंतर्गत पात्र अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा ₹३,००० इतका आहार भत्ता त्यांच्या आधारशी संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थिनींनी वसतिगृह कार्यालयाशी संपर्क साधून मुदतीत प्रवेश नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande