
परभणी, 03 जुलै (हिं.स.)। शिवसेनेच्या वतीने शेतकरी संवाद मेळाव्याचे मंगळवारी (दि. ७) येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचेया सभामंडपाचे उद्घाटन शुक्रवारी(दि. ३) जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आनेराव यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी सभापती पंढरीनाथ घुले, अतुल सरोदे, भगवानराव धस, व्यंकटराव शिंदे, पांडुरंग खिल्लारे, संजय सारणीकर, विजय भालेराव, शुभम पाष्टे, प्रदीप भालेराव, माणिक पोंढे, रमेश दळवी, सचिन पाटील, झेलसिंग बावरी, शेख रफिक, विनोद टेरे, माऊली धस, सुभाष माने, बाळू मोटे, शेखर सवंडकर, धनंजय देशमुख, रामप्रसाद रनेर, बन्सी भालेराव, दिनेश शर्मा आदींसहीत शिवसैनिक उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्यास शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जाहीर सभेस उपस्थिती लावली होती. याच पार्श्वभूमीवर आता शेतकरी संवाद मेळाव्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis