
छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यूस सेंटरवरही छापा टाकत एफडीएने कारवाई केली. पैठण गेट परिसरातील मे लकी ज्युस सेंटर येथे अन्न सुरक्षा विभागाने धाड टाकून तपासणी केली. अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांच्या पथकाला मुदतबाह्य टोनड दूध आणि अल्फान्सो मॅंगो पल्प ज्यूस तयार करण्यासाठी वापरला जात असल्याचे आढळले. हा साठा तत्काळ नष्ट करण्यात आला. तसेच आईस्क्रीमऐवजी फ्रोजन डेझर्टचा वापर आणि अस्वच्छता आढळून आली. मे फ्रेश ज्युस सेंटर आणि न्यू लकी ज्युस सेंटरचीही तपासणी करण्यात आली. संबंधित व्यावसायिकांना स्वच्छता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तपासणी अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis