खा. ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशानिमित्त लातूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार
लातूर, 03 जुलै, (हिं.स.)। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी लातूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धाराशिव येथील पक्ष कार्यालयात त्यांचा सत्कार केला. लातूर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने य
ओमराजे निंबाळकर


लातूर, 03 जुलै, (हिं.स.)। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी लातूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धाराशिव येथील पक्ष कार्यालयात त्यांचा सत्कार केला. लातूर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी एसटी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे राज्य सरचिटणीस व्यंकटराव बिरादार, निलंगा विधानसभा प्रमुख सोमनाथ स्वामी डिगोळकर, एसटी कामगार सेना महिला मराठवाडा अध्यक्षा प्रितीताई कोळी, उपजिल्हाप्रमुख रेखाताई पुजारी, देवणी तालुकाप्रमुख धनराज बिरादार, औसा विधानसभा प्रमुख किरण नारायनकर, तालुका संघटक अनिल सागर, शहरप्रमुख बंडू कोद्रे, उपशहरप्रमुख गोविंद धानुरे, शिवराज क्षीरसागर, व्यंकट पवार, प्रल्हाद सूर्यवंशी, धनंजय व्हताळे, बाळू कांबळे, अनंतपाळ तालुका समन्वयक मुरलीधर शिंदे, रेखा भोसले, वर्षा स्वामी, संजना निटुरे, दगडू चौधरी, उमाकांत बिरादार, महादेव मंत्री यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवाजीराव माने यांनी धाराशिव जिल्हा आणि औसा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी संघटनात्मक पातळीवर अधिक जोमाने काम करण्यात येईल, असे सांगितले. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला नवे बळ मिळाले असून पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी खासदार निंबाळकर यांच्यासमवेत विविध जनतेच्या प्रश्नांवर तसेच विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. धाराशिव हा शिवसेनेचा पारंपरिक गड असून औसा विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेचे मजबूत संघटन असल्याचे सांगत, भविष्यात हा गड अधिक बळकट करण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू करण्यात येणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर व धाराशिव जिल्ह्यात विकासकामांना तसेच पक्ष संघटनेच्या विस्ताराला अधिक गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande