
नाशिक, 03 जुलै (हिं.स.)। नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने वीस हॉटेल व आस्थापनांच्या कामाची तपासणी केली असून त्यामध्ये सात हॉटेलचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तर दोन हॉटेल व्यवसायिकांना सुधारणा करण्याची संधी देऊनही न केल्याने त्यांचेही परवाने निलंबित करण्यात आले आहे. तर चार ठिकाणी परवानगी न घेताच व्यवसाय सुरू असल्याचे लक्षात आल्याने ते हॉटेल देखील तात्काळ बंद करण्यात आले आहे.
मागील काही दिवसापासून सतत त्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या कारवाया सुरू आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर या कारवायांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अलीकडच्या काळात म्हणजेच 19 जून रोजी स्वतः राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नाशिकच्या दूध बाजारामध्ये भल्या पाटील छापा मारून कारवाई केली होती. ही कारवाई ताजी असतानाच पुन्हा एकदा राज्यामध्ये हॉटेल तपासणीची मोहीम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केली आणि त्यानंतर नाशिक मध्ये देखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या उत्तर महाराष्ट्र कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.
या बाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, वारंवार सूचना देऊनही तात्काळ कारवाई करण्यास सांगितलेली होती. पण कोणतीही सुधारणा न केल्यामुळे धुळे येथील मेडिकल कॉलेजमध्ये असलेले गजानन कॅन्टीन आणि भुसावळ येथील साके नाका येथील हॉटेलचे यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहे.
हे सर्व करत असताना दुसरीकडे सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत तपासणी करताना आणि ग्राहकांच्या तक्रारी तसेच कोणतेही नियम न पाळणे यामुळे नाशिक शहरातील द्वारका परिचारक असलेले हॉटेल राधिका पंचवटी परिसरात असलेले पेट्रोल जवळील ग्राउंड पॅलेस, जत्रा लिंक रोडवरील ग्रीन वॉल सिन्नर मधील लक्ष्मी या हॉटेलबरोबरच जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी रोडवर असलेले त्रिमूर्ती, तसेच जळगाव जिल्ह्यातील भानू आणि नंदुरबार येथील जाधव रेस्टॉरंट यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आलेले आहेत. हे सर्व करत असताना अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी करत असताना चार हॉटेल कोणतेही परवाने न घेता सुरू असल्याचे लक्षात आल्याने तात्काळ ते हॉटेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेलवर केलेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली असून हॉटेल व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV