माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी अध्ययन केंद्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उदघाट्न
डोंबिवली, 03 जुलै (हिं.स.)। भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी कार्यरत आगरी युथ फोरम व लोढा फाउंडेशन माध्यमातून भूमिपुत्र तरुण-तरुणींना नोकरी व उद्योगाची संधी मिळवून देण्यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला. त्याचाच भाग म्हणून पलावा सिटी येथे उभारण्यात आलेल्या
Ph2


डोंबिवली, 03 जुलै (हिं.स.)। भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी कार्यरत आगरी युथ फोरम व लोढा फाउंडेशन माध्यमातून भूमिपुत्र तरुण-तरुणींना नोकरी व उद्योगाची संधी मिळवून देण्यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला. त्याचाच भाग म्हणून पलावा सिटी येथे उभारण्यात आलेल्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी अध्ययन केंद्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले. या अध्ययन केंद्राचा फायदा कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील ४४ गावांमधील तरुण-तरुणींना होणार आहे. दरम्यान नोकरीसाठी वाढत्या स्पर्धांच्या काळात समाजातील तरुण-तरुणींना रोजगाराची दिशा देण्यासाठी पुढाकार आगरी युथ फोरम यांनी घेतला.

माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी अध्ययन केंद्रात एआय च्या वापरातून डिजिटल मार्केटिंग व इतर कामे, सायबर क्राईमच्या माध्यमातून फॉरेन्सिक लॅबसहi इतर संधी, मल्टी स्कील अभ्यासक्रमात इलेक्ट्रिक, प्लंबिंग, सुतार, एसी-फ्रिज-सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन आदी कामांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच ऍडव्हान्स बुटीशन कोर्स सुद्धा तरुणीना उपलब्ध करून दिले जाणार आहे. सदर अध्ययन केंद्राच्या उदघाट्नला नगरसेवक जालिंदर पाटील, नगरसेविका वेदिका पाटिल,चंद्रकांत पाटील, गजानन मांगरुळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

दरम्यान माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी इच्छा व्यक्त केली की ग्रामीण भागात अधिकचे वृक्षारोपण करणे गरजेचे आहे असे सांगतच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लोढा फाउंडेशन यासाठी ग्रामस्थांबरोबर असून जी रोपे लागतील त्याची व्यवस्था आम्ही करू असे सांगितले. त्याचप्रमाणे गावोगावी ग्रामीण जे जून तलाव आहेत त्याचे वर्गीकरण करून त्या तलावांच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा हा उपक्रम आपण सर्वांनी करू त्यासाठीही लोढा फाउंडेशन नक्कीच मदत करेल असे सांगितले. तसेच माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी अध्ययन केंद्र हे कायमस्वरूपी असणार आहे. वर्षानुवर्षे याचा फायदा गावातील तरुणांनी घ्यावा असे आवाहनही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

----------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande