
छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै (हिं.स.)।
जिल्हा परिषदेच्या उपकर निधीतून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याण योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांकडून दि.३१ जुलै पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ग्रामिण भागातील रहिवासी असलेल्या दिव्यांग व्यक्तिंनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहा.आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण बाबासाहेब अरवत यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या उपकरातून ५ टक्के निधी हा दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवला जातो. या उपकर निधीतून सन २०२६-२७ करीता दिव्यांगांना वैयक्तिक लाभ देण्यात येणार आहे. ग्रामिण भागातील लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात येणार असून १०० टक्के शासकीय अनुदान तत्त्वावर या योजना राबविण्यात येतात.त्यासाठी ग्रामिण भागातील रहिवासी असलेल्या पात्र लाभार्थ्यांकडून दि.३१ जुलै पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. उपकर निधीतून दिव्यांग व्यक्तिंना विनाअट घरकूल देणे, निराधार/ निराश्रीत अतितीव्र दिव्यांगांना विनाअट निर्वाह भत्ता देणे, अस्थिव्यंग व्यक्तिंना स्वयंचलित तीन चाकी सायकल (स्कूटर विथ ॲडाप्शन) डिव्हायसेस फॉर डेली लिव्हिंग, दिव्यांग व्यक्तिंचा बचत गटांना अनिदान देणे अशा योजना राबविल्या जातात. आवश्यक कागदपत्रे- ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असल्याचे युडीआयडी प्रमाणपत्र, तहसिलदार यांनी दिलेले अधिवास/रहिवासी प्रमाणपत्र, यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड झेरॉक्स, घरकुलासाठी ८ अ चा उतारा, तहसिलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला, स्कूटर विथ ॲडाप्शन साठी परिवहन अधिकारी यांचा परवाना/ अर्हक प्रमाणपत्र, बचत गटासाठी लाभ घ्यावयाचा असल्यास बचतगट नोंदणी प्रमाणपत्र (जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा किंवा महिला आर्थिक विकास महामंडळाने दिलेले.) ग्रामिण भागातील रहिवासी असलेल्या दिव्यांग व्यक्तिंनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहा.आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis