आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
इंडो-जर्मन टूल रूम आणि अमृतचा विशेष उपक्रम छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै (हिं.स.)। खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) युवक-युवतींना आधुनिक तांत्रिक कौशल्यांच्या माध्यमातून रोजगारक्षम बनविण्यासाठी शासनाच्या महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशि
आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्णसंधी


इंडो-जर्मन टूल रूम आणि अमृतचा विशेष उपक्रम

छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै (हिं.स.)। खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) युवक-युवतींना आधुनिक तांत्रिक कौशल्यांच्या माध्यमातून रोजगारक्षम बनविण्यासाठी शासनाच्या महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि इंडो-जर्मन टूल रूम (भारत सरकारची संस्था), छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमातून युवक-युवतींना अत्याधुनिक तांत्रिक प्रशिक्षण पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध होणार असून,नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधींसह स्वयंरोजगारासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन आणि सहाय्यही मिळणार आहे.

महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख उपक्रम राबवित आहे.

राज्यातील युवकांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योग,सेवा आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात सक्षम बनविणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.शासनाच्या विविध योजनांची माहिती,मार्गदर्शन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी अमृत सातत्याने कार्यरत आहे.

या विशेष उपक्रमाअंतर्गत अमृतच्या लक्षित गटातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) युवक-युवतींना इंडो-जर्मन टूल रूम येथे अत्याधुनिक मशिनरी व उपकरणांच्या सहाय्याने उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण,निवास आणि भोजनाचा संपूर्ण खर्च अमृत संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याने पात्र उमेदवारांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.

प्रशिक्षणादरम्यान युवकांना आधुनिक औद्योगिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार असून,प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.तसेच उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मार्गदर्शन,विविध शासकीय योजनांची माहिती आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

याशिवाय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.या प्रशिक्षण कार्यक्रमात सीएनसी मशीन ऑपरेटर,मशीनिंग तंत्रज्ञान,उत्पादन व गुणवत्ता नियंत्रण,औद्योगिक देखभाल कौशल्ये,संगणक आधारित तांत्रिक प्रशिक्षण तसेच उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक इतर कौशल्याधारित अभ्यासक्रमांचा समावेश आहे.या प्रशिक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) घटकातील अमृतच्या लक्षित गटातील १८ ते ४० वर्षे वयोगटातील तसेच संबंधित अभ्यासक्रमानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार पात्र राहतील.

----------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande