निवडणुकीत बदनाम झालेला तोच 'कोरस' पेन पुन्हा चर्चेत ? एकाच कंपनीला का मिळालं काम?
अमरावती, 03 जुलै (हिं.स.) राज्यातील आरोग्य विभागाच्या कारभारावर आणि पोलिओ लसीकरण मोहिमेच्या नावाखाली सुरू असलेल्या कोट्यवधींच्या खरेदीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक स्तरावर अथवा बाजारातील इतर नामांकित कंपन्यांकडून अत्यंत स्वस्त दरात
निवडणुकीत बदनाम झालेला तोच 'कोरस' पेन पुन्हा चर्चेत ? एकाच कंपनीलाच का मिळालं काम?


अमरावती, 03 जुलै (हिं.स.)

राज्यातील आरोग्य विभागाच्या कारभारावर आणि पोलिओ लसीकरण मोहिमेच्या नावाखाली सुरू असलेल्या कोट्यवधींच्या खरेदीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक स्तरावर अथवा बाजारातील इतर नामांकित कंपन्यांकडून अत्यंत स्वस्त दरात मार्कर पेन खरेदी करण्याचे पर्याय उपलब्ध असताना, आरोग्य विभागाने केवळ 'कोरस' कंपनीकडून तब्बल ४१.३० रुपये प्रति नग या जादा दराने लाखो पेन खरेदी केले आहेत. विशेषतः गत निवडणुकांच्या काळात याच कोरस कंपनीच्या मार्कर पेनची शाई बोटावरून तत्काळ पुसली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. त्यावेळी प्रचंड वाद होऊनही, याच कंपनीचे पुन्हा कोट्यवधींचे पेन खरेदी करण्यामागे नेमके कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.

गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटाला लावण्यासाठी याच कोरस कंपनीच्या मार्कर पेनचा वापर करण्यात आला होता. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर या पेनची शाई अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याच्या आणि ती लगेच मिटत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यावरून राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. जो पेन मतदानाच्या पवित्र प्रक्रियेत दर्जाहीन ठरला, तोच पेन लहान मुलांच्या पोलिओ लसीकरणासारख्या अत्यंत संवेदनशील राष्ट्रीय मोहिमेत सक्तीने का घुसविण्यात आला, याचे उत्तर देण्यास आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.

पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी शासनाकडून निधी प्राप्त होतो. प्रशासनाला आवश्यक असलेले साहित्य दरकरारानुसार खरेदी केले जाते. याच प्रक्रियेनुसार स्थानिक स्तरावर मार्कर पेन खरेदी करण्यात आले.

- डॉ. प्रवीण पारीसे, प्रभारी डीएचओ, अमरावती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande