खादी व ग्रामोद्योग मंडळाची मध केंद्र योजना; ५० टक्के अनुदानासह मोफत प्रशिक्षण
पुणे, 03 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यभर राबविण्यात येणाऱ्या मध केंद्र (मधमाशीपालन) योजनेसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण,
खादी व ग्रामोद्योग मंडळाची मध केंद्र योजना; ५० टक्के अनुदानासह मोफत प्रशिक्षण


पुणे, 03 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यभर राबविण्यात येणाऱ्या मध केंद्र (मधमाशीपालन) योजनेसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य खरेदीसाठी 50 टक्के अनुदान, तसेच शासनाच्या हमीभावाने मध खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय विशेष प्रशिक्षण व मधमाशा संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती कार्यक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.

ही योजना वैयक्तिक मधपाळ, प्रगतिशील मधपाळ केंद्रचालक तसेच नोंदणीकृत संस्थांसाठी उपलब्ध असून, निर्धारित पात्रता व अटींच्या अधीन राहून लाभ घेता येणार आहे. लाभार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण करणे तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे बंधपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, जुना पुणे-मुंबई रस्ता, शासकीय दूध डेअरीसमोर, पुणे येथे अथवा 020-25811859 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande