शासकीय जमिनीवरील पात्र निवासी अतिक्रमणांना पट्टे; अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन
अमरावती, 03 जुलै (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार १ जानेवारी २०११ पर्यंतच्या शासकीय जमिनीवरील पात्र निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करून पट्टे वाटपाची प्रक्रिया राज्यभर राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अमरावत
शासकीय जमिनीवरील पात्र निवासी अतिक्रमणांना पट्टे; अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन


अमरावती, 03 जुलै (हिं.स.)

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार १ जानेवारी २०११ पर्यंतच्या शासकीय जमिनीवरील पात्र निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करून पट्टे वाटपाची प्रक्रिया राज्यभर राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिचयात्मक बैठक झाली.बैठकीत शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२६ असल्याची माहिती देण्यात आली. तसेच अर्जाचा नमुना, स्वयंघोषणापत्र (अॅफिडेव्हिट), मानक कार्यपद्धती (SOP), अर्ज स्वीकारणे, पडताळणी आणि प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.महानगरपालिकेने नागरिकांना कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अर्जाचे नमुने, आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज स्वीकारण्याची ठिकाणे आणि कालावधी याबाबतची अधिकृत माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.अधिकृत सूचना जाहीर होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीकडे आर्थिक व्यवहार करू नयेत किंवा अर्ज सादर करण्याची घाई करू नये, असेही प्रशासनाने बजावले आहे. अधिकृत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande