आमदार सईद खान यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
परभणी, 03 जुलै (हिं.स.) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार सईद खान यांनी आज विधान भवन येथे सदिच्छा भेट घेतली. या वेळी विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून मिळालेल्या उमेदवारीसाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मा
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस  यांची आमदार सईद खान यांनी   घेतली  सदिच्छा भेट


परभणी, 03 जुलै (हिं.स.) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार सईद खान यांनी आज विधान भवन येथे सदिच्छा भेट घेतली. या वेळी विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून मिळालेल्या उमेदवारीसाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

भेटीदरम्यान आमदार सईद खान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, मुन्ना भैय्या पारवे, बाळासाहेब किसवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, तसेच सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे अधिक जोमाने जनतेच्या सेवेसाठी आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना आमदार सईद खान यांनी व्यक्त केली.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande