
आठवडाभर आयोजित धर्म सोहळ्यात जपानुष्ठान सह विविध कार्यक्रमांचे आयोजन
ओझर, 03 जुलै (हिं.स.)।
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र अयोध्या येथे आयोजित धर्म सोहळ्यात (३ जुलै) रोजी विश्वकल्याणार्थ श्रीराम नवकुंडात्मक महायज्ञास अनंत विभूषित श्रीमद जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. विश्वकल्याणार्थ आयोजित हा महायज्ञ ३ ते ७ जुलै या कालावधीत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रात संपन्न होत आहे.
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या परंपरेनुसार उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक तीर्थयात्रा महोत्सवानिमित्त आयोजित या धर्मसोहळ्यात दोन महायज्ञ, जपानुष्ठान, अखंड नंदादीप, अभिषेक, हस्त लिखित नामजप,रामचरितमानस पारायण, सामूहिक हनुमान चालीसा पठण तसेच भारतीय संस्कारांची जोपासना करणारा मातृ-पितृ पूजन सोहळा अशा विविध धार्मिक व संस्कारमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात हजारो भाविक सहभागी झाले असून अनेक संत,महंत यांची देखील उपस्थिती लाभत आहे.
या सोहळ्यात दोन महायज्ञ संपन्न होत आहे.या दोन्ही महायज्ञाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रावर आयोजित नवकुंडात्मक यज्ञाचे पौरोहित्य कमलाकरगुरु शिवपुरी, महेशगुरु शिवपुरी, सार्थकगुरू शिवपुरी,हरिशगुरु शिवपुरी आदी करत आहे.दुसरा महायज्ञ जपानुष्ठान कार्यक्रम स्थळावर सुरू आहे.या महायज्ञाचे पौरोहित्य विलासगुरु कुलकर्णी,प्रसादगुरु कुलकर्णी,गिरीशगुरु कुलकर्णी आदी करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV