तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत रविवारी सामंजस्य करार
रत्नागिरी, 3 जुलै (हिं.स.) । कोकणच्या आणि विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण व सुरक्षा क्षेत्राच्या दृष्टीने रत्नागिरी विमानतळाकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री डाउदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दल (ICG) व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये
तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत रविवारी सामंजस्य करार


रत्नागिरी, 3 जुलै (हिं.स.) । कोकणच्या आणि विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण व सुरक्षा क्षेत्राच्या दृष्टीने रत्नागिरी विमानतळाकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री डाउदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दल (ICG) व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये रविवारी सामंजस्य करार होणार आहे. रविवारी सकाळी ११ वाजता येथील टी.आर.पी. परिसरातील 'हॉटेल सावंत पॅलेस हॉल' येथे हा करार होईल.

कार्यक्रमाला राज्यमंत्री योगेश कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, सुनील तटकरे यांच्यासह आमदार उपस्थित राहणार आहेत. प्रशासकीय अधिकारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, द कमांडिंग ऑफिसर कुणाल सी. नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

या सामंजस्य करारामुळे केवळ नागरी विमान वाहतुकीलाच नव्हे, तर किनारपट्टीच्या सुरक्षेला आणि स्थानिक पर्यटनाला देखील मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande