
रत्नागिरी, 3 जुलै (हिं.स.) । कोंडगाव-साखरपा (ता. संगमेश्वर) येथील थोर समाजसेवक नानासाहेब शेट्ये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिवर्षी नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती व संस्था पुरस्कार दिले जातात. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना स्वतंत्रपणे पुरस्कार दिले जातात. यावर्षी कै.नानासाहेब शेट्ये यांचा ३३ वा स्मृतिदिन असून १ ऑगस्ट २०२६ रोजी साखरपा येथील नाना शेट्ये सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने यावर्षीच्या व्यक्ती व संस्था पुरस्कारांसाठी योग्य व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्ात येत आहेत. इच्छुकांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव १४ जुलैपर्यंत पाठवावेत. नानासाहेबा शेट्ये स्मृती पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, मानपत्र व रोख ३००० हजार रुपये असे आहे.
प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता - गणपत मारुती शिर्के (कार्याध्यक्ष), मुपो पेठवाडी, भडकंबा (साखरपा), ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी-४१५८०१ (९४२११४३६१२, ९१५८०५४४५४).
प्रस्ताव पाठविताना अध्यक्ष, कै . नानासाहेब शेट्ये स्मारक समिती, साखरपा असा उल्लेख करावा. इतर व्यक्तींनी देखील पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्थांची नावे सुचविण्यास हरकत नाही. मात्र नावे सुचविणाऱ्या व्यक्तींनी आपली पत्त्यासहित माहिती सोबत प्रस्ताव पाठविताना स्वतंत्र पानावर संपूर्ण माहिती, केलेले काम मिळालेले यापूर्वीचे पुरस्कार, वर्तमानपत्रातील कात्रणे आवश्यक फोटो पुरावे म्हणून जोडावेत.
इच्छुकांनी आपले प्रस्ताव वेळेत पाठवावेत असे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष संदेश ऊर्फ बापू शेट्ये, सरचिटणीस संतोष केसरकर, ग्रामीण समितीचे अध्यक्ष दत्ताराम शिंदे गुरुजी, चिटणीस रमाकांत शिंदे, खजिनदार मारुती शिंदे, रमाकांत शेट्ये यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी