अमरावती जिल्ह्यात केवळ २३.५४ टक्के पेरण्या; दुबार पेरणीचे सावट
अमरावती, 03 जुलै (हिं.स.) | खरीप पिकांच्या पेरणीची डेडलाइन १५ जुलै असली तरी १ जुलैपर्यंत अमरावती जिल्ह्यात ६ लाख ८२ हजार ९९२ हेक्टरपैकी १ लाख ६० हजार ७६६ हेक्टर म्हणजेच केवळ २३.५४ टक्के विविध पिकांची पेरणी झाली आहे. पुरेशा पावसाअभावी पेरण्या रखडल्य
जिल्ह्यात केवळ २३.५४ टक्के पेरणी दमदार पावसाची प्रतीक्षा, दुबार पेरणीचे सावट


अमरावती, 03 जुलै (हिं.स.) | खरीप पिकांच्या पेरणीची डेडलाइन १५ जुलै असली तरी १ जुलैपर्यंत अमरावती जिल्ह्यात ६ लाख ८२ हजार ९९२ हेक्टरपैकी १ लाख ६० हजार ७६६ हेक्टर म्हणजेच केवळ २३.५४ टक्के विविध पिकांची पेरणी झाली आहे. पुरेशा पावसाअभावी पेरण्या रखडल्या असून, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कमी पावसावर पेरणी करणाऱ्यांसोबतच धूळपेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट कायम आहे.

काही दिवसांपासून जिल्ह्यात पेरणीस पोषक पाऊस पडल्याने खरीप पेरणीला वेग आला आहे. मात्र, अजूनही समाधानकारक पाऊस बरसला नाही. २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार, प्रस्तावित ६,८२,९९२ हेक्टर क्षेत्रापैकी १,६०,७६६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे, जे एकूण उद्दिष्टाच्या २३.५४ टक्के आहे. पीकनिहाय आकडेवारी पाहता, जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक पेरणी झाली आहे. कापसाखालील क्षेत्र ६२,१८९.४ हेक्टरवर पोहोचले आहे. त्याखालोखाल सोयाबीन ५२,९६५ हेक्टर, तूर ३२,२३६.४ हेक्टर, मका ११,४४.२ हेक्टर आणि भात १,५१८.२ हेक्टर क्षेत्रावर आहे. श्रेणीनुसार, तृणधान्य पिकांखालील क्षेत्र १३,१०१.७हेक्टर, कडधान्यांखालील ३२,३९८ हेक्टर, तेल बियांखालील ५३,४९.८ हेक्टर आणि कापसाखालील ६२,१८९.४ हेक्टर होते. यावरून शेतकरी यांनाही नगदी पिकांकडे अधिक कल दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande