
छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै (हिं.स.) : वैजापुर येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन झाले असून या कार्यालयाचे नियमित कामकाज गट क्रमांक ७६, तळमजला,बीएसएनएल बिल्डिंग, तालुका वैजापुर येथे सुरु झाले आहे असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपल्या आवश्यक शासकीय सेवा, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, कर भरणा, प्रवाने, लायसन्स, लायसन्स नुतनीकरण इ. आवश्यक सेवांसंबंधी कामकाजासाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यालयाचा पत्ताः- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वैजापूर,
गट क्रमांक ७६, तळमजला, बीएसएनएल बिल्डिंग ता. वैजापूर,
जि. छत्रपती संभाजीनगर-४२३७०१.
दुरध्वनी ०२४३६-२२५७५७.
ई-मेल- dyrto.57-mh@mah.gov.in
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis