प्रिन्स इंग्लिश स्कूलची दैदिप्यमान कामगिरी; 24 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
परभणी, 03 जुलै, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, सेलूने राज्यस्तरावर अभूतपूर्व यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. राज्य
प्रिन्स इंग्लिश स्कूलची दैदिप्यमान कामगिरी; 24 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र


परभणी, 03 जुलै, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, सेलूने राज्यस्तरावर अभूतपूर्व यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. राज्यातील सीबीएसई व सीआयएससीई/आयएससी संलग्न शाळांमधून प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच सहावा क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

राज्य गुणवत्ता यादीत समर्थ अनंत तेलभरे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. तेजश्री महेशकुमार चौधरी यांनी राज्य द्वितीय, सृष्टी गोविंद कदम यांनी राज्य तृतीय, तर समर्थ श्याम मचाले यांनी राज्य सहावा क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता पाचवी गटात चंद्रशेखर गायकवाड यांनी राज्य दहावा आणि समर्थ सुरवसे यांनी राज्य पंधरावा क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मोलाची भर घातली. विशेष म्हणजे, या परीक्षेत शाळेचे तब्बल 24 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. ही कामगिरी शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धती, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, सातत्यपूर्ण शैक्षणिक नियोजन आणि स्पर्धा परीक्षांच्या प्रभावी तयारीचे द्योतक मानली जात आहे.

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे मोलाचे सहकार्य आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन यांचा मोठा वाटा असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान, सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, सदस्य डॉ. आदित्य रोडगे, मुख्याध्यापिका मीरा मिरिंडा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या यशामुळे प्रिन्स इंग्लिश स्कूलने राज्याच्या शैक्षणिक नकाशावर आपली वेगळी छाप उमटवली असून सेलू शहराच्या शैक्षणिक गौरवात भर घातली आहे.हे यश सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित... संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे म्हणाले, हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नसून पालकांचा विश्वास, शिक्षकांचे समर्पण आणि संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ध्येयाचा विजय आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यांचा समन्वय साधण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. भविष्यातही राज्य व राष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडवून समाजाला सक्षम नेतृत्व देण्याचा आमचा संकल्प आहे, असेही ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande