वन महोत्सवः ५ लाख २५ हजार रोपे सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध; रोप लागवडीचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै (हिं.स.)। सामाजिक वनीकरण विभागामार्फत दि.१५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सव राबविण्यात येतो. या कालावधीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रोपांची लागवड करावी यासाठी जिल्ह्यातील रोप वाटिकांमध्ये स्वस्त दरात ५ लक्ष २
वन महोत्सवः ५ लाख २५ हजार रोपे सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध; रोप लागवडीचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै (हिं.स.)।

सामाजिक वनीकरण विभागामार्फत दि.१५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सव राबविण्यात येतो. या कालावधीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रोपांची लागवड करावी यासाठी जिल्ह्यातील रोप वाटिकांमध्ये स्वस्त दरात ५ लक्ष २५ हजार रोपे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी संदीप गिरी यांनी दिली आहे.याबाबत सामाजिक वनीकरण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, ९ महिने वयाच्या सर्वसाधारण प्रजातीची रोपे अ,ब आणि क अशा वर्गवारीत उपलब्ध आहेत. अ वर्ग रोपांचा दर १८ रुप्ये प्रति रोप, तर ब वर्ग-११ रुपये, क वर्ग ८ रुपये प्रमाणे उपलब्ध आहेत. हे दर एरवीच्या दरांपेक्षा निम्मे वा त्यापेक्षाही कमी आहेत.विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण यांच्या अखत्यारीतील रोपवाटिकांमध्ये रोपांची उपलब्धता व संपर्क अधिकाऱ्याचे नाव क्रमांक याप्रमाणे-सावंगी ता. छत्रपती संभाजीनगर- रोपांची संख्या १ लाख ८० हजार, संपर्क अधिकारी- समीर इनामदार-९८६९१६०४०५वैजापूर रोपवाटिका (चर्च, आयटीआय)- रोपांची संख्या १ लाख ७२ हजार ५००, संपर्क- यु.एच. चिकटे-९४२३४१७२९५.पैठण(कातपुर)-रोपांची संख्या १ लाख ७२ हजार ५००, संपर्क जी.एस. सातपुते-९४२३४१७०८६. असे एकूण ५ लाख २५ हजार रोपांची उपलब्धता करण्यात आली आहे. या शिवाय वन महोत्सव कालावधीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रोप विक्री केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांची माहिती याप्रमाणे-जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर-संपर्क समीर इनामदार-९८६९१६०४०५.सार्वजनिक बांधकाम विभाग, फुलंब्री-श्रीमती पी.ए. काळे-९६५७२८१०५६.तहसिल कार्यालय, सिल्लोड-ए.टी. पाटील-८८८८९७९०५५.तहसिल कार्यालय, सोयगाव-एन.डी.काळे-९४०४६८०७७६.तहसिल कार्याल, वैजापूर- यु.एच. चिकटे-९४२३४१७२९५.पंचायत समिती कार्यालय, कन्नड-ए.एम.काटकर-९४२१६८५५५७.पंचायत समिती कार्यालय, खुलताबाद-आर.डी. वलथरे-९७६४७४११७३.पंचायत समिती कार्यालय, गंगापूर-ए.बी.गायके-७५८८५३८२०४.पंचायत समिती कार्यालय, पैठण-जी.एस. सातपुते-९४२३४१७०८६.या सर्व नागरिक, सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये आदिंनी रोप उपलब्ध करुन घ्यावे व लागवड करावी,असे आवाहन विभागीय वन अधिकारी संदीप गिरी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande