
छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै (हिं.स.)।
पैठण येथे प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांच्या वतीने सहकार सप्ताह निमित्त शासनाच्या योजनांची माहिती देणे व विणकारांकडून २०० युनिट वीज सवलत योजना योजना आणि गणेश चतुर्थी उत्सव भत्त्याचे अर्ज स्वीकृती करणे यासाठी विणकरांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास पैठण पंचायत समिती सभापती सौ.वैशाली विनोद बोंबले, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, प्रादेशिक उप आयुक्त वसंत घुले हे उपस्थित होते. सहायक आयुक्त वस्त्रोद्योग प्रशांत सदाफुले यांनी वस्त्रोद्योग विभागाच्या दोन्हीही योजनांची परिपूर्ण माहिती दिली. योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करावा त्यासाठी लागणारे कागदपत्रे होणारे चुका कसा टाळाव्यात याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. शासनाकडून दोन्ही योजनांच्या अनुषंगाने सुरू असलेला पाठपुरावा नवीन विणकारांना ओळखपत्र देण्यासाठी केंद्रीय बूनकर सेवा केंद्र मुंबई यांना त्यांची तपासणी करून त्यांचा ऑनलाईन डाटा अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी प्रधानमंत्री महोदय यांच्या मनकी बात या कार्यक्रमात उल्लेख केलेल्या सौ. कविता ढवळे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच आसावली महिला विणकर संस्थेच्या शशिकला भोसले तसेच अन्य महिला विणकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis