झाग्रेब ग्रँड चेस टूरमध्ये गुकेशचा दमदार विजय; संयुक्त दुसऱ्या स्थानावर झेप
झाग्रेब, 03 जुलै, (हिं.स.) झाग्रेब ग्रँड चेस टूरच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेशने शानदार कामगिरी केली. त्याने डच ग्रँडमास्टर अनिश गिरीचा पराभव करून गुणतालिकेत संयुक्त दुसरे स्थान गाठले. दरम्यान, फ्रान्सचा ग्रँडमास्
झाग्रेब ग्रँड चेस टूरमध्ये गुकेशचा दमदार विजय; संयुक्त दुसऱ्या स्थानावर झेप


झाग्रेब, 03 जुलै, (हिं.स.) झाग्रेब ग्रँड चेस टूरच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेशने शानदार कामगिरी केली. त्याने डच ग्रँडमास्टर अनिश गिरीचा पराभव करून गुणतालिकेत संयुक्त दुसरे स्थान गाठले. दरम्यान, फ्रान्सचा ग्रँडमास्टर अलीरेझा फिरोझा उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने अव्वल स्थान कायम राखले आहे.

फिरोझा याने १२ पैकी १० गुण मिळवून तीन गुणांची आघाडी घेतली आहे. त्याच्यापाठोपाठ विन्सेंट कीमर (जर्मनी), मॅक्सिम वाशिए-लाग्राव्ह (फ्रान्स), बोगदान-डॅनियल डीक (रोमानिया) आणि डी. गुकेश हे प्रत्येकी सात गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत.

भारताचा आर. प्रज्ञानंद, अनिश गिरी आणि उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह हे ६.५ गुणांसह त्यांच्या मागे आहेत. गुणतालिकेच्या तळाशी क्रोएशियाचा इव्हान सारिक आणि नेदरलँड्सचा जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट हे प्रत्येकी दोन गुणांसह आहेत.

गिरीविरुद्ध गुकेशची शानदार कामगिरी

पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना, 'रुय लोपेझ एक्सचेंज व्हेरिएशन'मध्ये गुकेशने सुरुवातीपासूनच अनिश गिरीवर दबाव कायम ठेवला. गिरीने आपल्या नियोजित चालींपासून (प्रिपरेशन) लवकरच फारकत घेतली, ज्यामुळे गुकेशला त्याच्या राजावर सलग आक्रमण करण्याची संधी मिळाली.

एका 'एक्सचेंज'मध्ये (मोहरांच्या अदलाबदलीत) सरशी साधल्यानंतर, भारतीय खेळाडूने कोणतीही चूक केली नाही आणि प्रभावीपणे सामना जिंकला.

प्रज्ञानंदला नशिबाची साथ नाही

दुसरा भारतीय खेळाडू आर. प्रज्ञानंदसाठी हा दिवस संमिश्र ठरला. त्याने जॉर्डन व्हॅन फॉरेस्टचा पराभव करून सुरुवात केली, परंतु त्यानंतर त्याला नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह आणि अलीरेझा फिरोझा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

फिरोझाविरुद्धच्या सामन्यात प्रज्ञानंद अशा स्थितीत पोहोचला होता जिथे सामना बरोबरीत सुटण्याची शक्यता होती, परंतु 'एंडगेम'मध्ये त्याने मोठी चूक केली; फिरोझाने या चुकीचा फायदा घेत विजय मिळवला. पराभवानंतर शानदार पुनरागमन

गुकेशने दिवसाची सुरुवात रोमानियाच्या बोगदान-डॅनियल डीकविरुद्ध अनपेक्षित पराभवाने केली, परंतु जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट आणि अनिश गिरी यांचा पराभव करून त्याने शानदार पुनरागमन केले.

आता 'रॅपिड' विभागातील तीन फेऱ्या बाकी आहेत. जरी फिरुझजा सध्या विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असला, तरी त्यानंतर होणारे १८ 'ब्लिट्झ' सामनेच या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरवतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande