बीड : कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला पाच वर्षे सक्तमजुरी
बीड, 03 जुलै (हिं.स.)। कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यावर मोठा दगड घालून तिचा खून करणाऱ्या पतीला अतिरिक्त सत्र न्यायालय बीडने पाच वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची सक्त शिक्षा सुनावली आहे. तलवाडा पोलिसांनी गोळा केलेल्या परिस्थितीजन्य पुराव
बीड : कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला पाच वर्षे सक्तमजुरी


बीड, 03 जुलै (हिं.स.)। कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यावर मोठा दगड घालून तिचा खून करणाऱ्या पतीला अतिरिक्त सत्र न्यायालय बीडने पाच वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची सक्त शिक्षा सुनावली आहे. तलवाडा पोलिसांनी गोळा केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या भक्कम साखळीमुळे न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

घटनेचे स्वरूप असे की, १९ मार्च २०२३ रोजी रात्री १० ते १०:३० वाजण्याच्या दरम्यान मौजे भेंडटकळी तांडा येथे आरोपी याने कौटुंबिक वादातून पत्नी हिच्या डोक्यावर मोठ्या दगडाने प्रहार केला होता. या गंभीर हल्ल्यात मृत्यू झाला. याप्रकरणी मृत महिलेचे नातेवाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून २० मार्च २०२३ रोजी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर श्रीराम वाघमोडे यांनी घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, रक्तरंजित दगड, आणि रासायनिक विश्लेषण अहवाल यांसारखे वैज्ञानिक पुरावे संकलित करून न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र सादर केले. सरकारी अभियोक्ता बी. एस. राख यांनी कोर्टात प्रभावी युक्तिवाद केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयश्री आर. पुलाटे यांनी आरोपीला भारतीय दंड संहिता कलम ३०४ भाग-२ अंतर्गत दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर श्रीराम वाघमोडे यांच्या पथकाने या खटल्याची यशस्वी पैरवी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande