आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी एक लाख वह्यांचे वाटप
सागर सिमेंट व एम. के. फाऊंडेशनचा उपक्रम सुरू सोलापूर, ३ जुलै (हिं.स.) : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सागर सिमेंट लिमिटेड आणि एम. के. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सा
sdfg


सागर सिमेंट व एम. के. फाऊंडेशनचा उपक्रम सुरू

सोलापूर, ३ जुलै (हिं.स.) : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सागर सिमेंट लिमिटेड आणि एम. के. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एक लाख वह्यांच्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी विजापूर रोड येथील सागर सिमेंट कार्यालयात करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम या संस्थांकडून सातत्याने राबविण्यात येत आहे. यंदाही जिल्हाभरातील विद्यार्थ्यांना एक लाख वह्यांचे वितरण करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी जनसेवक महादेव कोगनुरे यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला आधार देणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे कार्य अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कोगनुरे यांनी सागर सिमेंटच्या व्यवस्थापनाचे आभार मानत कंपनीचे मार्केटिंग हेड राजेश सिंग, अधिकारी, कर्मचारी आणि अधिकृत डीलर्स यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविणे शक्य झाल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला सागर सिमेंटचे अधिकृत डीलर्स, विविध क्षेत्रांतील मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार मिळणार असून, शिक्षणासाठी समाजाच्या सहभागाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande