महात्मा फुले वाड्यातील वटपूजनावरून वाद; मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीवर टीका
पुणे, 03 जुलै (हिं.स.)। महात्मा फुले वाडा परिसरात भाजपच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झालेल्या वटपूजन कार्यक्रमावरून पुण्यातील पुरोगामी संघटना आणि राजकीय विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. तर, हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून ये
fgdf


पुणे, 03 जुलै (हिं.स.)।

महात्मा फुले वाडा परिसरात भाजपच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झालेल्या वटपूजन कार्यक्रमावरून पुण्यातील पुरोगामी संघटना आणि राजकीय विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. तर, हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून येथे होत असून त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती, असे स्पष्टीकरण मेधा कुलकर्णी यांनी दिले आहे.

महात्मा फुले वाडा हे राज्य संरक्षित स्मारक असून ते पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. वाडा परिसरातील वडाच्या झाडाजवळ दरवर्षी वटपौर्णिमेनिमित्त वटपूजन केले जाते. मात्र, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या विचारांशी अशा प्रकारचा धार्मिक विधी विसंगत असल्याचा दावा पुरोगामी कार्यकर्त्यांनी केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते या ठिकाणी वटपूजनासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करण्याचे उपक्रम राबवत आहेत.

यंदा समस्त महात्मा फुले वाडा परिसर महिला गण यांच्या वतीने श्रेष्ठ वटपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या वटपूजनानंतर या कार्यक्रमावरून सामाजिक आणि राजकीय स्तरावर प्रतिक्रिया उमटू लागल्या.

महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस ॲड. शारदा वाडेकर यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेताना म्हटले की, महात्मा फुले वाडा हा राज्य संरक्षित ऐतिहासिक वारसा असून त्याचे ऐतिहासिक, वैचारिक आणि सामाजिक पावित्र्य जपण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाची आहे. पुरातत्त्व विभागाने जानेवारी महिन्यात अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी प्रतिष्ठानने केली होती. मात्र, मुंबई कार्यालयाने पुणे कार्यालयाच्या आदेशाला स्थगिती दिल्याचा दावा त्यांनी केला. तसेच वाडा परिसरात मेधा कुलकर्णी यांच्या सत्काराचा राजकीय स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने तो स्मारक संरक्षण नियमांशी विसंगत असल्याचेही त्यांनी म्हटले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande