मोहोळचे दुय्यम कारागृह बंद; २२ कैद्यांची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी
सोलापूर, 03 जुलै (हिं.स.)। राज्य शासनाच्या निर्णयानुसार मोहोळ येथील न्यायालयीन कोठडीसाठी वापरण्यात येणारे दुय्यम कारागृह अखेर बंद करण्यात आले आहे. कारागृहातील सर्व २२ कैद्यांना २ जुलै रोजी कडेकोट पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात
sdfg


सोलापूर, 03 जुलै (हिं.स.)। राज्य शासनाच्या निर्णयानुसार मोहोळ येथील न्यायालयीन कोठडीसाठी वापरण्यात येणारे दुय्यम कारागृह अखेर बंद करण्यात आले आहे. कारागृहातील सर्व २२ कैद्यांना २ जुलै रोजी कडेकोट पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले.

यापुढे मोहोळमधील न्यायालयीन कोठडीतील कैद्यांनाही कोल्हापूर कारागृहातच ठेवण्यात येणार आहे. राज्यातील अनेक दुय्यम कारागृहांची दुरवस्था आणि त्यातून कैदी पळून जाण्याच्या घटना लक्षात घेऊन शासनाने ही कारागृहे टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मोहोळ कारागृहातील आरोपींचेही स्थलांतर करण्यात आले. मोहोळ कारागृहात विविध गुन्ह्यांतील एकूण २२ कैदी होते. त्यामध्ये १८ पुरुष आणि चार महिला कैद्यांचा समावेश होता. बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजता पोलीस वाहनांच्या ताफ्यातून सर्व कैद्यांना कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले.

स्थलांतरादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कारागृह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. दरम्यान, कैद्यांना कोल्हापूरला रवाना करताना त्यांच्या नातेवाईकांनी निरोप देण्यासाठी कारागृहाबाहेर गर्दी केली होती. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले असून हा प्रसंग भावनिक ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande