यवतमाळमध्ये विविध गुन्ह्यांतील ८८५ किलो गांजा नष्ट
अमरावती, 04 जुलै (हिं.स.) यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात गांजा तस्करांविरोधात केलेल्या कारवाईत ८८५.१३५ किलो गांजा अंदाजे एक कोटी ७५ लाख रुपयांचा गांजा आज नष्ट करण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंळडाकडून अधिकृत परवानगी घेऊन हा
यवतमाळात विविध गुन्ह्यातील ८८५ किलो गांजा नष्ट


अमरावती, 04 जुलै (हिं.स.)

यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात गांजा तस्करांविरोधात केलेल्या कारवाईत ८८५.१३५ किलो गांजा अंदाजे एक कोटी ७५ लाख रुपयांचा गांजा आज नष्ट करण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंळडाकडून अधिकृत परवानगी घेऊन हा गांजा जिल्हा पोलिसांनी नष्ट केला. अंमली पदार्थाविरोधात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल २९ कारवाया करण्यात आल्या होत्या. कारवाईत तब्बल एक कोटी ७५ लाख रुपये किंमतीचा ८८५.१५० किलो गांजा जप्त करण्यात आला होता. जप्तीतील गांजा नष्ट करण्याचे निर्देश अंमली पदार्थ टास्क फोर्सचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी पत्र दिले होते. या पत्रानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागण्यात आली. ही परवानगी मिळाल्यानंतर गुरुवारी नष्ट करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात गांजा आढळून आल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

ही करवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, पोलिस उपअधीक्षक सुनील हुड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे, मनिष गावंडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande