अमरावती - जि. सामान्य रुग्णालयातील वॉर्डमध्ये सिलिंगचा भाग कोसळला; दुर्घटना टळली
अमरावती, 04 जुलै, (हिं.स.) अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये शनिवारी सिलिंगचा काही भाग अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने घटनेच्या वेळी त्या ठिकाणी कोणताही रुग्ण किंवा कर्मचारी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र या घटनेमुळे जिल
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्डमध्ये सिलिंगचा भाग कोसळला; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली


अमरावती, 04 जुलै, (हिं.स.) अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये शनिवारी सिलिंगचा काही भाग अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने घटनेच्या वेळी त्या ठिकाणी कोणताही रुग्ण किंवा कर्मचारी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रुग्णालयाच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यावेळी अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व उपाययोजनांचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात ठोस कामे न झाल्याने आज सिलिंग कोसळण्याची घटना घडल्याचे बोलले जात आहे.

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीची तातडीने तांत्रिक तपासणी करून धोकादायक भागांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. विशेषतः पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाने केवळ पाहणी न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे.

-------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande