कंत्राटी कामाच्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा
रायगड, 04 जुलै (हिं.स.)। गेल कंपनीच्या प्रकल्पात कंत्राटी कामावरून झालेल्या वादातून एका कामगारावर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढ
Attack-with-a-sharp-weapon-fol


रायगड, 04 जुलै (हिं.स.)। गेल कंपनीच्या प्रकल्पात कंत्राटी कामावरून झालेल्या वादातून एका कामगारावर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे धसाडे-कुणे फाटा (ता. अलिबाग) येथे गेल कंपनीच्या दीप प्रोजेक्टमध्ये कंत्राटी कामावर घेण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यावेळी आरोपी क्रमांक १ ते ५ यांनी बेकायदेशीरपणे एकत्र येऊन फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर हाताबुक्यांनी मारहाण करून त्यांना खाली पाडले.

मारहाणीतून बचाव करण्यासाठी फिर्यादी पळत असताना आरोपी क्रमांक १ याने हातातील धारदार शस्त्राने फिर्यादीच्या उजव्या पाठीवर वार करून त्यांना जखमी केले. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९४/२०२६ अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव आंगजे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande