ताडोबाच्या बफर मध्ये हल्लेखोर वाघाला केले जेरबंद
चंद्रपूर, 04 जुलै (हिं.स.)। ताडोबाच्या बफर मधील चंद्रपूर वनपरिक्षेत्रात एका तरुण शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला शनिवारी सकाळी यश आले. ताडोबाच्या बफर क्षेत्रात चोरगाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात मागील श
ताडोबाच्या बफर मध्ये हल्लेखोर वाघाला केले जेरबंद


चंद्रपूर, 04 जुलै (हिं.स.)। ताडोबाच्या बफर मधील चंद्रपूर वनपरिक्षेत्रात एका तरुण शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला शनिवारी सकाळी यश आले.

ताडोबाच्या बफर क्षेत्रात चोरगाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात मागील शनिवारी संजय माधवराव सिडाम या तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा होता. तो मूळचा राजुरा तालुक्यातील केळझरचा रहिवासी होता. चोरगाव येथे राहणाऱ्या आपल्या सासऱ्यांच्या शेतीची देखभाल करण्यासाठी तो आला होता. याबाबत ताडोबा व्यवस्थापनाने सदर वाघाला पकडण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे पाठवला होता. त्यास परवानगी आली होती. त्यानंतर त्या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम सुरू झाली होती. मोहिमेदरम्यान वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande