सोलापुरातील न्युरो हॉस्पिटल प्रकरण; डॉ. शोनाली वळसंगकर यांच्याविरुद्ध तक्रार
सोलापूर, 04 जुलै (हिं.स.)। सोलापुरातील एस. पी. न्युरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विनापरवानगी प्रवेश करून कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे, धमकावणे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी डॉ. शोनाली अश्विन वळसंगकर यांच्याविरोधात सदर बझार पोलिस ठाण्या
सोलापुरातील न्युरो हॉस्पिटल प्रकरण; डॉ. शोनाली वळसंगकर यांच्याविरुद्ध तक्रार


सोलापूर, 04 जुलै (हिं.स.)। सोलापुरातील एस. पी. न्युरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विनापरवानगी प्रवेश करून कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे, धमकावणे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी डॉ. शोनाली अश्विन वळसंगकर यांच्याविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी उमा शिरीष वळसंगकर (रा. १५८ सी, रेल्वे लाईन, सोलापूर) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, १८ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास डॉ. शोनाली वळसंगकर यांनी एस. पी. न्युरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विनापरवानगी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अडथळा आणत विरोध केला तसेच कर्मचाऱ्यांना धमकावत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.तक्रारीत संबंधितांना बघून घेण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे सदर बझार पोलिसांनी डॉ. शोनाली वळसंगकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलकर्णी करीत असून, उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande