
छत्रपती संभाजीनगर, 04 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा 'जिल्हास्तरीय लोकशाही दिन' सोमवार, दिनांक ६ जुलै रोजी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ वाजता हा लोकशाही दिन पार पडणार असल्याची माहिती सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी दिली आहे.
लोकशाही दिना सहभागी होणाऱ्या नागरिकांचे अर्ज सकाळी ११ ते १२ या वेळेतच स्वीकारले जातील.तक्रार वैयक्तिक असावी आणि अर्ज विहित नमुन्यात असणे अनिवार्य आहे. यापूर्वी तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दिला असल्यास, त्याची पोहोच पावती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल, सेवाविषयक व आस्थापनाविषयक बाबी, यापूर्वी लोकशाही दिनात दाखल केलेले अर्ज यात स्वीकारले जाणार नाही असे सुचित केले आहे.नागरिकांना लोकशाही दिनाचा लाभ घेण्यासाठी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis