रत्नागिरी : बोरघर येथे मोटारीच्या अपघातात पाच जण जखमी
रत्नागिरी, 4 जुलै (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावर बोरघर (ता. खेड) येथे मोटारीला झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात घडला. मुंबईहून खेडच्या दिशेने येणारी ही मोटार बोरघर परिसरात पोहोचली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे
मोटार झाडावर आदळल्याने झालेला अपघात


रत्नागिरी, 4 जुलै (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावर बोरघर (ता. खेड) येथे मोटारीला झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात घडला.

मुंबईहून खेडच्या दिशेने येणारी ही मोटार बोरघर परिसरात पोहोचली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याबाहेर जाऊन जोरदार धडकली. अपघातात मोटारीतील पाच जण जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, १०८ रुग्णवाहिका सेवा तसेच जय हिंद ॲम्ब्युलन्स सर्व्हिसचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने बाहेर काढून प्राथमिक उपचार केल्यानंतर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या बचावकार्यात अनिकेत हंबीर, ऋषी दरेकर, घोलप तसेच स्थानिक मदत पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande