
जळगाव, 04 जुलै, (हिं.स.) - वरणगाव शहरातील गंगाराम कॉलनी परिसरात कत्तली व बेकायदेशीर वाहतुकीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या सात पशुधनाची वरणगाव पोलिसांनी धाड टाकून सुखरूप सुटका केली. या कारवाईत वाहतुकीसाठी वापरली जाणारी महिंद्रा मालवाहतूक गाडी जप्त करण्यात आली असून, एकूण सुमारे ३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधारे गंगाराम कॉलनी परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने आणून सात पशुधन बांधून ठेवल्याची माहिती वरणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक इस्माईल शेख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान शेडमध्ये बांधून ठेवलेले सहा गोऱ्हे आणि एक गाय अशा सात पशुधनाची सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच पशुधनाच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी महिंद्रा मालवाहतूक गाडी (क्र. एमएच १९ सीवाय ९७४३) ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल फिरोजखान आसिपखान पठाण यांच्या फिर्यादीवरून सोहिल शेख बशिर कुरेशी व रफिक रफिक कुरेशी या दोघांविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर