यवतमाळ जिल्ह्यात सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
यवतमाळ, 04 जुलै (हिं.स.)। साधारणतः दहा दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पावसाने एन्ट्री केली. पाऊस जोरदार बॅटींग करीत आहे. शुक्रवारी (ता. तीन) सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू होती. सातत्याने पडणार्!या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झ
यवतमाळ जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटींग; शेतकर्!यांमध्ये समाधानाचे वातावरण


यवतमाळ, 04 जुलै (हिं.स.)। साधारणतः दहा दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पावसाने एन्ट्री केली. पाऊस जोरदार बॅटींग करीत आहे. शुक्रवारी (ता. तीन) सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू होती. सातत्याने पडणार्!या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सहा लाख २८ हजार हेक्टरवर खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मुग, ऊस, भाजीपाला आदी पिकांची लागवड झाली आहे.

मॉन्सूनचे आगमन विलंबाने झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांची चिंता प्रचंड प्रमाणात वाढली होती. अर्ध्याहून अधिक जून महिना पूर्णत: कोरडा गेला. उष्णतासुद्धा कमी झाली नव्हती. परंतु कृषी विभागाने खरीप हंगामाचे नऊ लाख हेक्टरवर नियोजन केले होते. आभाळाकडे चातकासारखे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अशात दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन झाले. सुरवातीला काही तालुक्यात हजेरी लावलेल्या पावसाने हळूहळू संपूर्ण जिल्हा व्यापला. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास दीडशे मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून, २५ हून अधिक महसुली मंडळात ६५ मीमी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तरीसुद्धा शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपली असून, मागिल आठवड्याभरात पावसाने जोरदार बॅटींग केली.

गुरुवारी (ता. दोन) रात्रीच्या सुमारास आलेल्या पावसाने थोड्याथोड्या वेळाने उसंत घेतली. परंतु शुक्रवारी पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. मशागती आटोपून घेतलेल्या शेतकर्!यांनी बी-बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी करून ठेवली होती. पेरणीयोग्य पाऊस कोसळण्याची प्रतीक्षा संपताच शेतकऱ्यांची शेतशिवारात लगबग पहावयास मिळाली. आजघडीस जिल्ह्यातील सहा लाख २८ हजार ८३ हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, ऊस, भाजीपाला आदी पिकांची लागवड केली आहे. यात प्रामुख्याने कापूस तीन लाख ९८ हजार ३९४ हेक्टर, सोयाबीन एक लाख ५४ हजार ४२४ हेक्टर, तूर, ७० हजार ३६८, ऊस दहा हजार ३७६, तर इतर क्षेत्रावर उर्वरित पिकांची लागवड झाली आहे. परंतु सलग कोसळणार्!या संततधार पावसामुळे उर्वरित पेरण्यासुद्धा येत्या दहा ते बारा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

धरणातील जलसाठ्यात वाढ

साधारणतः दहा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या पूस प्रकल्पात ३०.४१, अरुणावती ६९.१६, बेंबळा ६८.८० दलघमी साठा आहे. तर अधरपूस ३६, सायखेडा १२, गोकी १९.१५, वाघाडी १८.१४, बोरगाव २.२३, नवरगाव ५.६३ दलघमी जलसाठा आहे. यात काहीअंशी वाढ झाल्यामुळे थोड्याफार प्रमाणात चिंता मिटल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

तालुकानिहाय झालेल्या पेरण्या

आर्णी - ३१४३३ बाभूळगाव - ३५६९४ दारव्हा - ४१९०० दिग्रस - १८१०६ घाटंजी - ५७५१२ कळंब - ३२२११ महगाव - ४११५५ मारेगाव - ३७६१२ नेर - ३१२२० पांढरकवडा - ४३२२३ पुसद - ४६३७८ राळेगाव - ४२७५० उमरखेड - ४२४७७ वणी - ४५२४५ यवतमाळ - ४५९१० झरीजामणी - ३५३४७

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande