अमरावतीतील मालखेड ग्रामपंतायतमध्ये विकसित भारत रोजगार अभियानाचा शुभारंभ
अमरावती, 04 जुलै (हिं.स.) केंद्र व राज्य शासनाच्या विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान अंतर्गत ग्रामपंचायत मालखेड येथे अभियानाचा शुभारंभ गट विकास अधिकारी राणी माळवे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील
विकसित भारत रोजगार अभियानाचा शुभारंभ


अमरावती, 04 जुलै (हिं.स.)

केंद्र व राज्य शासनाच्या विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान अंतर्गत ग्रामपंचायत मालखेड येथे अभियानाचा शुभारंभ गट विकास अधिकारी राणी माळवे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्षातून किमान १२५ दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच शाश्वत विकास, कौशल्य विकास, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांची निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी राणी माळवे यांनी उपस्थित ग्रामस्थांना शासनाच्या विविध रोजगार व आजीविका योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून, या अभियानामुळे ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास ग्रामपंचायत प्रशासक लता पाटील, विस्तार अधिकारी रमेश मेश्राम, तांत्रिक अधिकारी मंगेश काकडे, ग्रामपंचायत अधिकारी साधना सोनोने, रोजगार सेवक गजानन बागडे, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटांच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande