
मुंबई, 04 जुलै (हिं.स.) - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक ०५.०७.२०२६ रोजी कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान हार्बर लाईनवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
यामुळे प्रभावित होणाऱ्या सेवा खालीलप्रमाणे असतील:-
हार्बर लाईन:
ब्लॉकचा कालावधी: कुर्ला – वाशी अप आणि डाऊन हार्बर लाईनवर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत .
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईनवरील सेवा सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या अप हार्बर लाईनवरील सेवा सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ या वेळेत रद्द राहतील.
ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी – पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
हार्बर लाईनवरील प्रवाशांना ब्लॉकच्या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांद्वारे प्रवास करण्याची मुभा असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी