वारसांना परवाना हस्तांतरणासाठी आता १ हजार रुपयांचा शुल्क; पुणे महापालिकेचा निर्णय
पुणे, 04 जुलै (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या अधिकृत फेरीवाल्यांच्या नोंदणी प्रमाणपत्र अथवा परवान्याचे वारसांच्या नावावर हस्तांतरण करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. यानुसार, यापूर्वीचे ७०० रुपये शुल्क
वारसांना परवाना हस्तांतरणासाठी आता १ हजार रुपयांचा शुल्क; पुणे महापालिकेचा निर्णय


पुणे, 04 जुलै (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या अधिकृत फेरीवाल्यांच्या नोंदणी प्रमाणपत्र अथवा परवान्याचे वारसांच्या नावावर हस्तांतरण करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. यानुसार, यापूर्वीचे ७०० रुपये शुल्क वाढवून आता १ हजार रुपये करण्यात आले असून, संबंधित प्रस्तावाला समितीने मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापालिकेने १९८९ पूर्वी शहरातील स्टॉलधारक, स्थिर हातगाडीधारक आणि बैठ्या व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना एकूण ७ हजार ७७९ परवाने दिले होते. या परवान्यांचे वारसांच्या नावावर हस्तांतरण करण्यासाठी २००५ मधील महापालिका ठरावानुसार आई-वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, नातू, नात तसेच पती-पत्नी अशा रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली होती.मात्र, २०१४ मध्ये केंद्र सरकारचा पथविक्रेता कायदा लागू झाल्यानंतर त्यातील तरतुदींशी सुसंगत बदल करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार परवाना हस्तांतरण प्रक्रियेत सुधारणा करत शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande