२३ गावांतील अनधिकृत विकासाविरोधात पुणे महापालिकेची कारवाई
पुणे, 04 जुलै (हिं.स.)। पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये अनधिकृत प्लॉटिंग आणि बेकायदा इमारतींमधील सदनिकांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिकेची कायदेशीर परवानगी नसलेले भूखंड किं
PMC news


पुणे, 04 जुलै (हिं.स.)। पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये अनधिकृत प्लॉटिंग आणि बेकायदा इमारतींमधील सदनिकांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिकेची कायदेशीर परवानगी नसलेले भूखंड किंवा सदनिका खरेदी करू नयेत, असे जाहीर आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच अनधिकृत बांधकामे आणि प्लॉटिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या २३ गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महापालिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या भागातील बांधकाम परवानग्या आणि विकास नियंत्रणाचे कामकाज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) होते. मात्र, आता या सर्व अधिकारांची जबाबदारी महापालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे.महापालिकेने स्पष्ट केले आहे की, काही व्यक्ती आणि विकसकांकडून आवश्यक परवानग्या न घेता भूखंडांचे तुकडे करून विक्री तसेच बेकायदा इमारतींमधील सदनिकांची विक्री केली जात आहे. अशा मालमत्ता खरेदी करणाऱ्या नागरिकांना भविष्यात कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तिची कायदेशीर स्थिती आणि महापालिकेच्या परवानग्यांची खातरजमा करूनच व्यवहार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande