नांदेड - आर. एस. ब्रदर्सचा आषाढम् चॅलेंज केजी सेल सुरू
नांदेड, 4 जुलै, (हिं.स.)। नांदेड येथील आर. एस. ब्रदर्सतर्फे बहुप्रतीक्षित ''आषाढम् चॅलेंज केजी सेल''ला सुरुवात झाली आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये हा विशेष सेल सुरु असून ग्राहकांना कपड्यांवर ७० टक्क्यांपर्यंत सूट दे
नांदेड - आर. एस. ब्रदर्सचा आषाढम् चॅलेंज केजी सेल सुरू


नांदेड, 4 जुलै, (हिं.स.)। नांदेड येथील आर. एस. ब्रदर्सतर्फे बहुप्रतीक्षित 'आषाढम् चॅलेंज केजी सेल'ला सुरुवात झाली आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये हा विशेष सेल सुरु असून ग्राहकांना कपड्यांवर ७० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी साड्या, लेहेंगा, ड्रेस मटेरिअल, पुरुषांसाठी पारंपरिक व आधुनिक पोशाख तसेच मुलांसाठी विविध आकर्षक वस्त्रसंग्रह उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच वजनावर आधारित 'केजी सेल' संकल्पनेमुळे ग्राहकांना दर्जेदार कपडे किफायतशीर दरात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

आगामी सण-उत्सव, लग्नसराई आणि कौटुंबिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नवीन डिझाइन्सचा मोठा साठा करण्यात आला आहे. ग्राहकांनी लवकरात लवकर जवळच्या नांदेड येथील आय. टी. आय. रोडवरील आर. एस. ब्रदर्स शोरूमला भेट देऊन या विशेष ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande